news-details
मनोरंजन

'पंचक', 'प्रेमाची गोष्ट', आणि आता 'लोकशाही'; महाराष्ट्राची लाडकी सून बॉक्स ऑफिसवर उडवणार धुरळा

तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेच्या माध्यमातून 2023 मध्ये छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. तिची ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतदेखील अव्वल आहे. सर्वत्र या मालिकेची चर्चा आहे. मालिकेचं वेगळं कथानक प्रेक्षकांना भावलं आहे. एकंदरीतच तेजश्रीचं कमबॅक यशस्वी ठरलं आहे.

तेजश्री गाजवणार रुपेरी पडदा
तेजश्री प्रधानने मालिकांसह सिनेमांतही काम केलं आहे. तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. 'ओलीसुकी','झेंडा','तिची कथा','ती सध्या काय करते','डॉ. प्रकाश बाबा आमटे','लग्न पहावे करुन',शर्यत' अशा अनेक सिनेमांत तेजश्रीने काम केलं आहे. 

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments