news-details
मनोरंजन

पंकज त्रिपाठीच्या 'मैं अटल हूं'चा दुसरा ट्रेलर रिलीज

'मैं अटल हूं' चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या पक्षावर अनेक आरोप करण्यात आले. पक्षावर आरोप झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी खूपच दु:खी होतात. ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठी माजी पंतप्रधानांच्या व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय देताना दिसत आहेत. या ट्रेलरमध्ये राम मंदिर आंदोलन आणि पोखरण अणुचाचणीची झलकही दाखवण्यात आली आहे.

ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठी पूर्णपणे अटलबिहारी बाजपेयींच्या भूमिकेत आला आहे. भाषा, वेशभूषा, लूक आणि बोलण्याची शैली हुबेहुब अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखी आहे. या अभिनेत्याने माजी पंतप्रधानांचे प्रत्येक पैलू पडद्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने मांडले आहेत. त्याच शैलीत ते प्रभावी भाषण करताना दिसले आहेत. 

एपीजे अब्दुल कलाम यांनी पोखरण अणुचाचणीच्या यशाबद्दल अटलबिहारी वाजपेयी यांचे अभिनंदन केले आणि अणुबॉम्बला काय उत्तर आहे याचे उत्तर देशाला मिळाले ते दृश्यही ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. अटलबिहारी यांच्या कार्यकाळात दिल्ली ते लाहोर या बससेवेसह इतर अनेक गोष्टींसह मंदिरासाठीचे आंदोलन हेदेखील ठळकपणे दिसून येत आहे. दरम्यान, सध्या 'मैं अटल हूं' या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. १९ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments