महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
पोस्ट ऑफिस च्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करता येते. पोस्ट ऑफिसच्या सर्वसामान्यांसोबत महिलांसाठीही खास योजना आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करुन बचत करता येते आणि सरकारी योजना असल्यामुळे गुंतवणुकीची हमीदेखील मिळते. यापैकी एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत पत्र योजना आहे. ही खास महिलांसाठीची एक छोटी बचत योजना आहे. ही योजना एप्रिल 2023 ते मार्च 2025 या कालावधीसाठी सुरू करण्यात आली आहे.
महिला सन्मान बचत पत्र ही बचत योजना महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. महिला स्वतःसाठी आणि त्यांच्या अल्पवयीन मुलींसाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. याशिवाय पती पत्नीसाठीही या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
महिला सन्मान बचत पत्र या योजनेवर मिळणाऱ्या व्याजावर कर लावला जातो, म्हणजेच ही योजना करमुक्त नाही. ही योजना देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. या योजनेत, आयकर कायदा 1961 (आयकर कायदा 1961 80C) च्या 80C अंतर्गत कर लाभाचा लाभ दिला जातो. मात्र, योजनेत मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो. याचा अर्थ या योजनेवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर लाभ उपलब्ध नाही. व्याजावर टीडीएस कापला जातो.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेतील गुंतवणुकीचा कालावधी दोन वर्षांचा आहे. गुंतवणुकीची मर्यादा किमान रु. 1000 ते कमाल रु. 2 लाख आहे. तर सरकार 7.5 टक्के व्याज देते. हे व्याज तिमाही आधारावर जमा केले जाते. पहिल्या वर्षानंतर खातेदार 40 टक्के रक्कम काढू शकतात. समजा खाते ऑक्टोबर 2023 मध्ये उघडले असेल तर ते ऑक्टोबर 2025 मध्ये मॅच्युअर होईल. कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येऊ शकते.
0 Comments