news-details
तंत्रज्ञान

आंबेघर दुर्घटनेची मन हेलावून टाकणारी बातमी, 8 महिन्याचं बाळ अजूनही ढिगाराखाली

सातारा, 2६ जुलै : सातारा जिल्ह्यात (Satara District) झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू (40 dead) झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून (Administration) जाहीर करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे (rains) बचावकार्यात अडथळे येत असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

सातारा जिल्ह्यात एकाचवेळी झालेलं भूस्खलन, त्यानंतर झालेली अतिवृष्टी आणि पुराचं साम्राज्य अशा वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये मिळून 40 मृतदेह आतापर्यंत सापडले असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. यातील सर्वाधिक मृत्यू आंबेघर, मिरगाव आणि ढोकावळे या भागात झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील 7 जण अद्यापही बेपत्ता असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments