पंजाब : बॅालीवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या अभिनयासोबतच वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत येत असते. म्हणूनच कंगनाकडे वादग्रस्त अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं. तसंच काही दिवसांपूर्वी तिने देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक होतं. खरं स्वातंत्र्य हे आपल्याला 2014 मध्ये मिळाल्याचे सांगितले होतं. यामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. आताही कंगना तिच्या अशाच बेताल वक्तव्यानं चर्चेत आली आहे. यावेळी तिनं पंजाबमध्ये सरकार स्थापन होताच सरकारवर टीका केली आहे.
कंगनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिनं नुकतंच पंजाबमध्ये जे आपचे सरकार स्थापन झाले आहे त्यावर सडकून टीका केली आहे. ती म्हणते,तुकडे तुकडे गँग पुन्हा अॅक्टिव्ह झाली आहे म्हणायची. कंगनाच्या या विधानामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच यंदाच्या विधानसभेमध्ये पंजाबमध्ये आपनं मोठा विजय मिळवला आहे. आप पक्षाचे भगवंत मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यावर कंगनानं टीका केली आहे.
दरम्यान, आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदासाठी मान यांची निवड केली आहे. त्यावर देखील कंगनानं टीकास्त्र सोडले आहे. सध्या कंगना चर्चेत असलेल्या द काश्मिर फाईल्स या चित्रपटामुळे वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये करत आहे. तिनं दोन दिवसांपूर्वी कुटूंबियांसमवेत हा चित्रपट पाहिला. त्यावर तिनं देशातील मुस्लिम लोकसंख्येविषयी भाष्य केले होते. यावेळी तिनं चाहत्यांना हा चित्रपट आवर्जुन पाहण्याचे आवाहन देखील केले आहे.
0 Comments