news-details
मनोरंजन

“किती पैसे दिले”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्यामुळे कपिल शर्मा झाला ट्रोल

कपिल शर्मा हा कॉमेडी किंग म्हणून ओळखला जातो. कपिलने त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कपिल सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तो त्याचं मतं मांडताना दिसतो. यावरून बऱ्याचवेळा तो ट्रोल होताना दिसतो. यावेळी कपिले सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे.

कपिलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्वीट केलं आहे. हे ट्वीट करत कपिलने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कपिल म्हणाला, “पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भारताच्या अमूल्य खजिन्याला थेट ऑस्ट्रेलियातून पुन्हा आपल्या देशात आणण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. जय भारत.. हर हर महादेव.” कपिलचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments